Thursday, April 14, 2016

आठवण … साक्ष होतानाची … !!!

आज ही तो दिवस आठवतो … जेंव्हा तू माझा हात तुझ्या हातात घेतला होतास …

मागच्या काही दिवसांपूर्वी … नव्हे … काही महिन्यांपूर्वी भेटलेला … ३ दिवसांची ती भेट … त्यानंतर त्या ३ दिवसांच्या आठवणीत गेलेले ते पुढचे कित्येक महिने ….

बोलणं तसं अगदी गरजेचं नसलं तरी  …. फक्त गरज म्हणूनच बोललं पाहिजे का अश्या प्रश्न उत्तरांच्या खेळात अडकलेल्या मनाची स्थिती … त्यातूनच निर्माण झालेली ती अतोनात ओढ … एकमेकांच्या केवळ विचारातूनच ओठांवर आलेले ते स्मितहास्य  …. चहाच्या कपासोबत आणि स्थिर असलेल्या निसर्ग सौंदर्यात शोधलेली ती शांतता … अन त्याला साक्ष असणाऱ्या त्या गोड आठवणी ….

घटना घडताना त्या का घडत आहेत … किंवा त्या का घडल्या … याच उत्तर नेहमीच अन्नुत्तरीत असायचं । पण त्यातून उत्त्पन्न झलेली वृत्ती मात्र नेहमीच कायम राहिली … का कोण जाणो … तिला कधीच कुठला कुस्पर्श झाला नाही … अशाच घटनांच्या भरती ओहोटी नंतर … निरभ्रं असलेले सुखद आयुष्य जणू आम्ही एकत्र येऊ पाहत होता …

घटनाक्रम कुठे अन कसा जुळाला हे जरी तितकं महत्वाचं नसलं …  तरी … त्यानंतरची घडलेली घटना … नक्कीच जास्त महत्वाची होती …

त्याची नि माझी … ती भेट …

जणू काही फक्त दिसणं पुरेसं होतं … इतक्या दिवसांचा जोपासलेला … वाट पाहण्याचा छंद …. आज कायमचा विराम घेतोय ! … हा आभास आहे कि विश्वास !! … कळेनासं होतं सारं …

ज्याच्या स्वप्नात रमण्यात …  तो एक वेगळेपण जाणवून देणारा … माझा होईल का पासून फक्त माझाच होतोय अन … अन … तेही कायमचा  !!! … या सत्याची साक्ष होताना स्वतःला पाहून … मी अगदी निःशब्द होते …

तो दिवस आजही आठवतो …. जेंव्हा तू माझा हात तुझ्या हातात घेतला होतास …

आई पप्पा आणि सगळ्या जनसमुदायासमोर जणू काही अगदी प्रफुल्लीत मनाने सगळ्यांना सांगू पाहत होतास की … आज मला माझं पूर्णत्व मिळालं … तेही तुम्हा सर्वांच्या अनुमतीने … तुझ्या डोळ्यातले ते सुखावलेले भाव … आज ही मला आठवतात  …

तुझ्या हाताचा तो स्पर्श काहीशी नवीन अनुभूती देत होता … तू कायमचा माझा होतोय … आणि त्याची छोटीशी निशाणी म्हणून आपला संयोग जुळवणारी ती अंगठी तू अखेर माझ्या बोटावर हळुवार चढवली होतीस …

एकमेकांत गुंतणं यापेक्षा ते काय वेगळं असू शकतं … जणू काही हेच ती अंगठी सांगू पाहत होती …

हाच तो दिवस … अन हीच ती आठवण … साक्ष होतानाची … !!! 

6 comments:

 1. Mi kiti hi wela ha lekh wachu det, man kahi bharat ch nahi.. pratyek weles 1 smit hasya sodun jat ani 1 prashn.. anakhin ka nahi?

  Tu khup sundar lihites ani mala watat ki tu khup khup lihawas n tujha ha chhand nit jopawas.. :)

  ReplyDelete
 2. धन्यवाद . आठवण आणि वास्तव एकत्र अनुभवण्यातला माझा आनंद मी इथे रेखाटला आहे इतकंच.

  वस्तुतः सतत वाचावसं वाटण्यामागे या लिखाणातली आणि तुझ्या मनातली भावना मिळती जुळती आहे बाकी काही नाही .

  असो तुझी टिप्पणी मला अतिशय आवडली. :)

  ReplyDelete
 3. वाह वाह..अप्रतिम लिहलयंस गं
  अशीच सुंदर सुंदर लिहीत रहा ।

  ReplyDelete
 4. छान लिहिलंय :D

  ReplyDelete
 5. खूप खूप सुंदर

  ReplyDelete
 6. खूप खूप सुंदर

  ReplyDelete